गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:35 IST)

भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल : फडणवीस

devendra fadnavis
दसरा मेळाव्यातील भाषणांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. “भाषणं करताना कायदा मोडला तर कायदा आपलं काम करेल”असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 
“राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. विचार मांडले जातात. हे विचार कायद्याच्या चौकटीत राहून खुषखुषीत पद्धतीने, व्यंगातून किंवा अतिशयोक्तीतूनही मांडले जावेत”,असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्था नीट राखली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
 
काही जणांकडून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या घटकांनी गर्दीचा फायदा घेऊ नये, याकडे गृह विभागाचे विशेष लक्ष असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor