बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 7 जून 2022 (16:06 IST)

बीडमध्ये अवैध गर्भपात प्रकरण;महिला डॉक्टरला अटक

arrest
बीड मध्ये अवैध गर्भपात केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात महिलेच्या पतीसह इतर नातेवाईक आणि महिला डॉक्टरला अटक केले आहे. 

सीताबाई उर्फ शीतल गाडे असे या मयत महिलेचे नाव आहे. त्या ऊसतोड मजूर होत्या. पहिला तीन मुली असून चौथ्यांदा त्यांना गर्भ राहिला. रविवारी त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्यांना खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हारुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं

तेव्हा त्यांना महिलेचे अवैध गर्भपात केल्याचे समजले. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी नातेवाईकांना आणि पतीची कसून चौकशी केल्यावर त्यांनी अवैध गर्भपात केल्याची कबुली दिली. मयत महिलेला या पूर्वी 9 ,6 आणि 3 वर्षाच्या तीन मुली आहेत.या प्रकरणी पोलीस पती आणि इतरांना घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अजून कोण सहभागी आहे आणि काढलेल्या गर्भाची विल्हेवाट कोठे लावली पोलीस प्रकरणाचा पुढील शोध घेत आहे.