शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (15:22 IST)

नवनीत राणाच्या विरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी

navneet rana
अपक्ष खासदार नवनीत राणा त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत. यापूर्वी देखील शिवडी न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट जारी केले होते. या विरोधात सत्र न्यायालयात राणा यांनी धाव घेतली होती. मात्र न्यायालयात कुठल्याही प्रकारच्या वॉरंटला स्थगिती मिळाली नव्हती. त्यामुळे कारवाई करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिले आहेत.
 
दम्यान, यासंदर्भातील याचिकेवर 7 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जात पडताळणी प्रकरणांमध्ये मुलुंड पोलिसांनी जामीन पात्र वॉरंटला आणखी मुदत द्यावी, याकरिता शिवडी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मात्र या अर्जावर याचिकाकर्ते यांनी आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, सत्र न्यायालयाने कुठलेही संरक्षण तथा अद्याप निर्णय दिलेला नाही. आजदेखील पोलिसांनी अद्यापही कारवाई केलेली नाही, असे कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिवडी न्यायालयाच्या न्यायावात शांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ अजामीनपात्र वॉरंट काढून तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor