1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (12:19 IST)

चेंबूरमध्ये सिलेंडरच्या स्फोटात इमारत कोसळून 4 जण जखमी

चेंबूर मध्ये चेंबूर कॅम्प परिसरात गोल्फ क्लब जवळ जुन्या परिसरात आज पहाटे सिलिंडरचा स्फोट होऊन परिसरातील इमारत  कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यांनी अडकलेल्या 11 जणांची सुखरूप सुटका केली.  

चेंबूरच्या जुन्या बॅरेक गोल्फ क्लब जवळ असलेल्या दुमजली इमारतीच्या चाळीतील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या घरात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे वरच्या मजल्यावर काही लोक अडकले होते. पोलिसांना आणि अग्निशमनदलाला या घटनेची माहिती मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकास अंभोरे, अशोक अंभोरे, सविता अंभोरे आणि रोहित अंभोरे असे एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले आहे.  
 
Edited by - Priya Dixit