1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (10:46 IST)

वांद्रे येथे LPG गॅस सिलेंडरचा स्फोट, 8 जण जखमी

cylinder blast
मुंबईतून एक मोठी बातमी आहे. वांद्रे येथे एलपीजी गॅस सिलिंडरला स्फोट होऊन आग लागल्याची घटना सकाळी 6 :18 वाजता घडली. या आगीत 8 जण गंभीर जखमी झाले. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

वांद्रेच्या गझबंद रोडवरील फिल्टर गल्लीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागून कपडे, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन मुळे आग वेगाने पसरली. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यापासून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

या आगीत 8 जण जखमी झाले  असून सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बीएमसीने सांगितले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 Edited by - Priya Dixit