गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (17:15 IST)

बस आगारात एस टी बसचालकाने बॅगेच्या बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केली

लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातएसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.
 
उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाल. पण अद्याप आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.