सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (23:24 IST)

राज्यात 16 वर्षीय मुलाला लस देताना कोवॅक्सीन ऐवजी चुकीची लस दिली

देशात कोरोना विरुद्धची लढाई सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर बालकांना ही लस दिली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लसीकरणाबाबत मोठे दुर्लक्ष झाले. येथे 16 वर्षीय मुलाला चुकीची लस देण्यात आली.
ही घटना नाशिक जिल्ह्यातील आहे. गुरुवारी, अधिका-यांनी सांगितले की मुलाला लसीकरण करायचे असताना चुकून कोविशील्ड लस देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते की, केवळ 15-18 वर्षे वयोगटातील मुलांनाच कोवॅक्सीन दिली जाईल. असे सांगितले जात आहे की सोमवारी येवला तहसीलच्या पाटोदा गावातील स्थानिक आरोग्य केंद्रात झालेल्या गैरसमजामुळे या मुलाला कोवॅक्सीनऐवजी कोविशील्डने लसीकरण करण्यात आले.
हा प्रकार मुलाच्या वडिलांना कळताच त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर तहसील आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहते यांनी पाटोदा आरोग्य केंद्राला भेट दिली. चुकीने असे घडल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने  मुलाची प्रकृती आता ठीक असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.. 2 महिन्यांनंतर, तो लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र होऊ शकतो. असे ही ते म्हणाले.