मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:38 IST)

‘ती’ पाण्याची बाटली आणायला गेली मात्र…

‘ते’ दोघे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना तहान लागली म्हणून थांबले व पत्नी पाण्याची बाटली आणण्याची गेली. मात्र दुर्दैवाने ती रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगात असलेल्या एका कंटनेरने तिला चिरडले.
 
ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे चौफुली येथे घडली. शकीलाबी नूर शहा (वय ५०, रा. तिडी,ता. वैजापुर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहा पतीपत्नी आपल्या दुचाकीवरून वैजापूरकडून कोपरगावच्या दिशने जात होते. प्रवास करीत असतांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ते थांबले.
 
पाण्याची बाटली आणण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या (एमएच ४६ एएफ ७९०३) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला होता. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पसार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.