शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:52 IST)

वाईनरी कंपनीत संचालक असणं गुन्हा आहे का? राऊंताचा सोमय्यांना सवाल

"ते (किरीट सोमय्या) म्हणतायत त्याप्रमाणे आमची जर एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल, तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणं, चोऱ्या-माऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं कधीही चांगलं. पण भाजपाचे थोतांडी लोकं जे काही म्हणत आहेत, अशा काही वायनरीज आमच्या कुटुंबाच्या असतील तर नक्कीच मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

"संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातल्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसायात भागिदारी सुरू केली. 16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या वाईन उत्पादन ग्रुपसोबत करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता, उर्वशी या कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या", असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.
 
किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा उलट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.