1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 20 एप्रिल 2022 (21:15 IST)

रवी राणांचा ‘मातोश्री’वर जाण्याचा मुहूर्त ठरला

ravi rana
भाजप आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता.आता राणा यांनी मातोश्रीवर जाण्याची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 22 एप्रिलला मातोश्रीलवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा रवी राणा यांनी केली आहे.
 
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा शुक्रवारी दिला होता. त्यामुळे शनिवारी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा यांच्या अमरावतीमधील घरावरही निषेध मोर्चाही काढला होता. आता राणा यांनी मातोश्रीवर येण्याची तारीख जाहीर केल्याने शिवसैनिक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता असून, तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, यावेळी बोलताना मंत्री अनिल परब म्हणाले होते की, शिवसेनेला आव्हान देण्यासाठी रवी राणा खूपच लहान आहेत. त्यांची तेवढी औकातही नाही. या दाम्पत्याने आजपर्यंत सुपाऱया घेऊनच काम केले आहे. आम्हाला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. रवी राणा आणि नवनीत राणा यांना राजकारणात स्वत:चे असे स्थान नाही. त्यांचा बोलवात धनी जे सांगतो, ते स्क्रिप्ट वाचण्याचे काम राणा दाम्पत्य करते, असेही परब म्हणाले होते.