1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

निशा पाटीलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील २५ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील निशाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.

१४ जानेवारी २०१५ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास निशा पाटील आपल्या मैत्रिणीकडे आली असता शेजारच्या घरातून धूर निघत असल्याचे तिने पाहिले.  घराला आग लागली आणि घरात लहान मुलगी असल्याचे कळताच निशाने त्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी घरात उडी घेतली. घराच्या छताला आग लागलेली, पडद्यांनीही पेट घेतल्याने ज्या पाळण्यात लहानगी झोपली होती तो पाळणाही जळून तुटला होता. पाळण्यातली लहानगी पूर्वी देशमुख जिवाच्या आकांताने रडत होती. हे चित्र पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता निशाने पूर्वीला आगीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले.