शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:16 IST)

जवखेडे तिहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

crime
नगर जिल्ह्यातील जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड प्रकरणात जिल्हा न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाने आरोपींवर ठेवलेले आरोप ते सिध्द करू शकले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने  नोंदवत आरोपींना निर्दोष सोडले. 20 ऑक्टोबर 2014 ला रोजी हे  हत्याकांड झाले होते.
 
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यलागड्डा यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता. प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव या आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या घटनेत संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील जाधव यांची झाली होती
 
काय आहे प्रकरण
 
20 ऑक्टोबर 2014 ला रोजी संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील जाधव यांच्यांवर हल्ला झाला होता. संजय जाधव यांच्यावर 19 जखमा होत्या. त्याचे पोटापासून दोन तुकडे केले गेले होते. जयश्री यांच्या अंगावर 26 जखमा होत्या. सुनीलच्या शरीराचे मुंडके, हात, पाय वेगवेगळे तुकडे केलेले होते.
 
काय राहिले कच्चे दुवे
 
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात आधुनिक आणि तीक्ष्ण हत्याराने तुकडे केले आहेत, असा अभिप्राय नोंदवला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करताना मयतांच्या अंगावरील दागिने काढून घेणे गरजेचे असते. परंतु जयश्रीच्या अंगावरील दागिने उत्तरीय तपासणीपूर्वी काढले नव्हते. संजय यांच्या हातातील कडेही तसेच होते.
 
पोलिसांनी आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांच्या घरातून बांबूची काठी, कुऱ्हाड, कोयता, करवत जप्त केली. ही हत्यारे नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवली. या प्रयोगशाळेने यावर रक्‍ताचे डाग नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतरही पोलिसांनी पुन्हा ही हत्यारे डी. एन. ए. तपासणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीमध्येही या हत्यारांवर रक्‍ताचे डाग नसल्याचे आढळून आले आहे.