बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जीप ३०० फूट खोल दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

साताऱ्यात  झालेल्या अपघातात एक जीप ३०० फूट खोल दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण भोजलिंगाचे दर्शन घेऊन परतत होते. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे  (सांगली), मनिषा आटपाडकर, कंठेमाला कलास आटपाडकर (सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 
 
माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील डोंगरावर भोजलिंगचे देवस्थान आहे. शनिवारी पौर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. यावेळी आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून जीपने १३ भाविक भोजलिंग डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने पुन्हा गावी निघाले होते. डोंगरावरून खाली येत असताना अचानक जीपचे चाक घसरले. या घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्यामुळे जीप थेट ३०० फूट दरीत जाऊन कोसळली.