मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (18:44 IST)

रस्त्यांवर खडे दाखवा एक लाख रुपये घेऊन जा जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

Jitendra Awhad
ठाणेच्या कळव्यातील रस्त्यांवर एक खड्डा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असे जाहीर आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी कळव्यातील एका कार्यक्रमात देत, नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपण लाखभर मतांनी निवडून येणार असे स्पष्ट करताना आपली विधानसभेची उमेदवारी आपणच आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच ठरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर राजकारणाचा वारा सुसाट असतो तो कधी दिशा बदलेल हे सांगता येत नाही असेही ते म्हणाले.
 
दोन एकर जागेत दोन कोटी रुपये खर्चून तीन वर्षांच्या मुलांपासून मोठ्यापर्यंत विविध मैदानी खेळ खेळण्याचे संकुल ठाण्यातील कळवा- विटावा येथे महापालिकेच्या वतीने उभारलेल्या दिवंगत मुकुंद केणी क्रीडा संकुलाचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी कळव्यातील रस्त्यांवर खडे दाखवा एक लाख रुपये घेऊन जा असे जाहीर आवाहन केले. तसेच पुढे बोलताना, त्यांनी कळव्यातील प्रत्येक झोपडपट्टीत काँक्रीटीकरणाचे रस्ते आहेत. असे चांगलं कामे करून कळवावासीयांच्या हदयात बसण्याचे काम येथील नगरसेवकांनी केले आहे. कुठलीही अडचण असो येथील नगरसेवक २४ तास नागरिकांच्या पाठीमागे उभे असतात. याचा मला अभिमान आहे. तसेच आमची टीम ही सुपर काम करत असल्याने कधीही निवडणूक आल्या तरी येथील चार ते पाच पॅनल डोळे झाकून निवडून येतील असे असा विश्वास ही गृहनिर्माण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.