सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दानवेंच्या वक्त्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जोडे मारो आंदोलन

ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या छातीवर गोळी मारण्याऐवजी पायावर गोळी मारू शकत होते असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांच्या नेतुत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
 
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरली आहे. शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन व रस्तारोको केले होते. शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा. हा नाकर्तेपणा झाकण्यासाठीच शेतकऱ्यांवर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबारात दोन शेतकऱ्यांना गोळी लागली असून आंदोलनकर्त्यांवर गोळीबार न करता हा प्रश्न चर्चेने सुटू शकला असता. आंदोलन रोखण्याचे अनेक पर्याय असताना गोळीबार हा पर्याय होवूच शकत नाही हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे या गोळीबार प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यात रावसाहेब दानवेनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारण्याचे केलेले वक्तव्य अतिशय अशोभनीय असून यातून हेच स्पष्ट होते कि शेतकऱ्यांना गोळीमारा. यामुळे दानवेनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली आहे.