शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (07:58 IST)

कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदार विवेक पाटील यांना अटक

कर्नाळा बँकेतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेले शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अखेर अटक करण्यात आली. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील घरातून ताब्यात घेतले. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पनवेलमध्ये या गैर व्यवहारात विरोधात काही महिन्यांपूर्वी मोर्चे काढण्यात आले होते. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे ठेवीदार संकटात सापडले होते. सदर प्रकरणी विवेक पाटील यांना अटक करावी, यामागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती.
 
कर्नाळा बँकेत ५१३ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस झाला असतानाही बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली. या सर्व प्रकरणामुळे ठेवीदार संकटात सापडले असून त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने अनेक मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, ईडीने मागच्या महिन्यात विवेक पाटील यांची वाहने देखील जप्त केली होती.