शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:52 IST)

देवस्थान जमिनीसाठी आता 'पश्‍चिम महाराष्ट्र पॅटर्न'

राज्यातील देवस्थानांच्या जमिनींवर कोणतेही अतिक्रमण होऊ नये व त्या सुरक्षीत राहाव्यात यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थानांप्रमाणे राज्यातील इतर देवस्थानांनाही आता त्यांच्या ताब्यातील जमिनींचे रेकॉर्ड ठेवावे लागणार आहे. देवस्थानांच्या ताब्यातील या जमिनींबाबत सरकार मॉडेल ऍक्‍ट आणण्याबाबत विचार करीत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आपल्या ताब्यातील जमिनींचा सर्व तपशील ठेवते. आता तोच पॅटर्न इतर राज्यातील देवस्थांनांना लागू करण्यात आला आहे. राज्यातील देवस्थानांच्या ताब्यातील जमिनींच्या संदर्भात राज्य सरकारने महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक मंत्रालयात गुरूवारी पार पडली. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ताब्यात 10 हजार हेक्‍टर जमिन आहे. या जमिनीचा ज्या पद्धतीने रेकॉर्ड ठेवण्यात येतो, तीच पद्धत राज्यातील इतर देवस्थानांच्या जमिनींसाठीही वापरण्यात येणार आहे. देवस्थानांच्या जमिनी सुरक्षित रहाव्यात. जमिनींचा त्याच देवस्थानांना फायदा मिळावा हा या मागचा उद्देश आहे. लवकरच राज्यातील सर्व देवस्थानांसाठी एकच मॉडेल ऍक्‍ट देखील लागू करण्यात येणार आहे.