शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:13 IST)

कोंढाणे धरण घोटाळा : आरोपपत्र दाखल, तटकरेंचे नाव नाही

रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण घोटाळाप्रकरणी लाचलुचपत विभागाने ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल केले असून आरोपपत्रात तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचं नाव नाही. मात्र  त्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी या आरोपपत्रात केली आहे.

लाचलुचपत विभागाने 3 हजार पानी चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं आहेत. यामध्ये एफ ए कंस्ट्रक्शनचे, निसार फतेह खत्री, कोकण पाटबंधरे विकास विभागचे देवेंद्र शिर्के, तत्कालीन संचालक बी बी पाटील, तत्कालीन मुख्य अभियंता पी बी सोनावणे, तत्कालीन मुख्य अभियंता आर डी शिंदे, तत्कालीन अधीक्षक अभियंता ए पी कालूखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश रीठे, तत्कालीन कार्यकारी अभियंता यांची नावे आहेत. या सातही आरोपींना 25 हजारांचा जामीन मंजूर झाला आहे. जेव्हा अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा हजर रहाण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.