बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (16:59 IST)

अपघातामध्ये सोलापुरातील सहा जण ठार

कर्नाटकातील बागलकोटमध्ये क्रूझर गाडी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघात सोलापुरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले सहा जणही सोलापुरातील दारफळ येथील आहेत. कर्नाटकामध्ये औषध घेण्यासाठी सोलापुराती बारा जण गेले होते तेव्हा हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील बारा जण गुरुवारी कर्नाटकात कॅन्सरच्या उपचारासाठी रुणाला घेवून गेले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णासह इतर बारा प्रवाशांना घेवून निघालेल्या या क्रूझर आणि बसमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला.