नाशिक : दिल्ली, उत्तर प्रदेशसह पंजाबमध्ये सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या तसेच तब्बल ३७ गुन्हे दाखल असलेला भूमाफिया पीयूष तिवारीला दिल्ली पोलिसांनी नाशकात सापळा रचून अटक केली आहे.
तिवारी मोस्ट वाँटेड गुन्हेगार असून सहा महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.त्याला शोधून देणाऱ्या अथवा माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
पोलिस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ निरीक्षक वाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे अँटी ऑटो थेफ्ट युनिट गुन्हेगाराचा माग काढत २१ मार्चला इंदिरानगर पोलिस ठाण्यात आले होते.
त्या दिवशी शिवजयंती असल्याने पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त होते. तरी काही कर्मचारी दिल्ली पोलिसांच्या पथकासोबत पाठवण्यात आले. नाशिकच्या इंदिरानगर भागातील रसोई या हॉटेलमध्ये तिवारी हा गप्पा मारत बसलेला असताना दिल्ली पोलिसांच्या पथकाने कुठलाही सुगावा लागू न देता तिवारीच्या मुसक्या आवळल्या.
पुनीत भारद्वाज नावाने नाशकात वावर:
फरार तिवारीवर २०१६ ते २०१८ दरम्यान अनेक गुन्हे दाखल झाले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो वेगवेगळ्या राज्यांत वास्तव्य करत होता. सप्टेंबर २०२१ पासून तो नाशकात वास्तव्याला होता. स्वत:चे नाव बदलून पुनीत भारद्वाज या नावाने तो वावरत होता. नाशकातील रविशंकर मार्गावरील सद्गुरू अपार्टमेंटमध्ये तो वास्तव्यास होता.
पोलिस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ निरीक्षक वाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे अँटी ऑटो थेफ्ट युनिट गुन्हेगाराचा माग काढत २१ मार्चला इंदिरानगर पोलिस ठाण्यात आले होते. त्या दिवशी शिवजयंती असल्याने पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त होते. तरी काही कर्मचारी दिल्ली पोलिसांच्या पथकासोबत पाठवण्यात आले. नाशिकच्या इंदिरानगर भागातील रसोई या हॉटेलमध्ये तिवारी हा गप्पा मारत बसलेला असताना दिल्ली पोलिसांच्या पथकाने कुठलाही सुगावा लागू न देता तिवारीच्या मुसक्या आवळल्या.
स्वत: हॉटेल व्यावसायिक असल्याचे सांगत नाशिकमध्ये हॉटेल तसेच रेस्टॉरंट व्यावसायिकांना हेरून लाखो रुपयांचा नफा कमवून देण्याचे आमिष दाखवत त्यांना तो हॉटेल सुरू करून देत होता. त्या बदल्यात गुंतवणूकदारांकडून तो पैसे घेत होता. कांदा व्यावसायिक म्हणूनही तो स्वत:चा परिचय करून देत असल्याचे त्याला अटक केल्यानंतर तपासात समोर आले आहे.
फसवणुकीचे ३७ गुन्हे:
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जमिनी आणि फ्लॅट खरेदी- विक्रीच्या माध्यमातून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा तिवारीवर आरोप आहे. त्याच्या विरोधात दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये फसवणुकीचे ३७ गुन्हे दाखल आहेत.
आयकर छाप्यात १२० कोटी रोकड हस्तगत:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारीने २०११ मध्ये ८ शेल कंपन्या स्थापन केल्या. २०१८ पर्यंत त्या त्याने १५ ते २० पर्यंत वाढवल्या. २०१६ मध्ये त्याच्या घरावर आयकरने छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे १२० कोटींची रोकड सापडली होती.
नाशकात हॉटेल व्यावसायिक म्हणून नाव बदलून दोन वर्षांपासून होता वावर:
दिल्ली पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत तिवारी होता. दिल्लीहून पळून येऊन नाशिकला आल्यानंतर तो नाव आणि ओळख बदलून राहत होता. त्याला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते.