बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (12:49 IST)

लोहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी

Lohgarh fort
Large crowd of tourists at Lohgad लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे लोहगड किल्ल्यावर रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गडावर पाय ठेवण्यासाठीदेखील जागा नसल्याने चार तास गोंधळ उडाला. गडावर चेंगराचेंगरी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल चार तास गडावर गोंधळाचे वातावरण होते. सोशल मिडियावर या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर गडावर योग्य नियोजन आणि पोलीस बंदोबस्तदेखील ठेवणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 
लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे येथील मोठ्या प्रमाणात पर्यंटक लोहगडावर येतात. रविवारी सुट्टी असल्याने लोहगड येथे पर्यटकांची गर्दी उसळली होती. या किल्ल्यावर पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. तब्बल चार तास पर्यटकांना अडकून बसावे लागले होते. अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत पर्यटक गडाखाली आले. यामुळे गडावर मोठी दुर्घटना होता होता टळली.