शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 जून 2022 (17:16 IST)

सूरज शेळके यांना अखेरचा निरोप

लडाख मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खटावमधील जवान सुरज शेळके यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शनिवारी राञरी खटाव येथे आणण्यात आले .त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. जवान सुरज शेळके हे 2018 साली सैन्यदलात भरती झाले होते. ते सध्या लडाख येथे 141 फिल्ड रेजिमेंट मध्ये लान्सनायक पदावर कार्यरत होते आणि देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. 

त्यांना सेवा बजावत असता गुरुवारी श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या धाकट्या बंधूंना देण्यात आली. त्यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या घरी खटाव येथे सोमनाथनगर आणण्यात आले. पार्थिवाला पाहूनच त्यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्यांची अंत्ययात्रा मार्गात रांगोळी काढत फुलांचा वर्षाव करत निघाली. त्यांच्या वर त्यांच्या घराच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमातात बंदुकीच्या फेरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सूरज शेळके अमर रहे, 'भारत माता की जय ' जब तक सूरज चांद रहेगा सूरज तुम्हारा नाम रहेगा अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्यांना साश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.