गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (11:17 IST)

लातूर : चपलेच्या दरावरुन वाद, ग्राहकाचे डोके फोडले

लातूरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या गंजगोलाईत चपलेच्या दरावरुन सुरु झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने ग्राहकाचे डोके फोडले. ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह बाबा तांबोळी यांच्या चपलेच्या दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली. 

ग्राहक माधव सुर्यवंशी पत्नी आणि मेव्हणा विक्रम शिंदेसह दुकानात गेले होते. सुर्यवंशी यांच्या पत्नीने चप्पल पाहिली. दुकानदाराने त्याची किंमत 250 रुपये सांगितली. तेव्हा त्यांनी 200 रुपयांना चपलेची मागणी केली. भडकलेल्या दुकानदाराने ग्राहकाला शिवीगाळ केल्याचा, तसंच महिलेबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करण्यात आला. हमरीतुमरीवरुन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. दुकानदाराने सहकाऱ्यांना बोलावून ग्राहकाला बेदम चोप दिला.