रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (21:01 IST)

माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट : अब्दुल सत्तार

abdul sattar
टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत.  एका  वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.
 
माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे” असा गौप्यस्पोट अब्दुल सत्तार यांनी केला.