शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:14 IST)

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा

मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर मांडल्या आहेत. असाच प्रकारे लिंगायत समाज सुद्धा आक्रमक झाला असून सुरवातील चर्चेच्या पद्धतीने आपल्या मागण्या त्यांनी सरकार समोर ठेवल्या आहेत. महाराष्ट्रातील लिंगायत धर्मातील समाजातील मागण्यांच्या संदर्भात येथील सह्याद्री अतिथी गृह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक ठेवली होती. बैठकीत राज्यमंञी तथा लिंगायत आरक्षण समितीचे शासकीय सदस्य विजय देशमुख सोबत लिंगायत समाजाचे  संघटनांचे प्रमुख व संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रलंबित प्रश्न निकाली लावू असे आश्वासन दिले आहे. 
 
बैठकीत  अनआरक्षित जाती पोटजातींना आरक्षण, लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा शिफारस, महात्मा बसवेश्वर स्मारकास १०० कोटी निधी, इत्यादी बाबतीत चर्चा झाली आहे.लिंगायत धर्मातील अद्यापही अनआरक्षित उर्वरीत जाती पोटजातींना विशेषतः लिंगायत वाणी ओबीसी प्रवर्गातील उपजातींना लिंगायत वाणी तत्सम पोटजात असलेल्या वंचित अशा हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत, लिंगायत, लिंगधर, लिंगडेर, लिंगायत दिक्षिवंत, शिलवंत, चतूर्थ, पंचम, रड्डी, तिराळी, कानोडी इत्यादी यांना शुध्दीपञक काढून लिंगायत वाणी मधील ओबीसी चे आरक्षण अधिकार हक्क द्यावेत अशी जोरदार मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांनी त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाला सकारात्मक टिप्पणी करायला सांगणार आहे, सोबतच  याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांचे जाती पोटजातीचे प्रमाणपत्र गृहीत धरण्यासाठी सरकार मान्यता देईल असे  मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा राज्य सरकारची केंद्र सरकारकडे शिफारस बाबतीत मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले आहे. संविधानात्मक बाबतीत सरकार सकारात्मक असून त्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, तर राज्य मागासवर्ग आयोग व अल्पसंख्यांक विकास विभाग आयोग यांना लिंगायत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक आदेश देण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. लिंगायत धर्म आणि लिंगायत धर्मातील जातींना आरक्षण एकाच वेळी दोन्ही घेता येणार नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.  शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की राज्य मागासवर्ग आयोग लिंगायत हा धर्मपंथ म्हणून आरक्षण देता येत नाही असे सांगते आणि दुसरीकडे लिंगायत स्वतंत्र धर्म असताना नाही म्हणून अल्पसंख्यांक नाकारले जाते अशावेळी लिंगायत यांनी काय करायचे असा प्रश्न बैठकीत उपस्थित केला. मात्र सरकार सर्व बाबींचा विचार करणार असून सकारत्मक आहे असे मुख्यमंत्री    देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.