Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. तसेच प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होऊन अवघ्या 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले असून महायुतीने महाराष्ट्राची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील. उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
पिंपरी-चिंचवड, पुणे येथे झालेल्या वादानंतर ऑडी कारच्या चालकाने मोटारसायकलस्वाराला कारच्या बोनेटला लटकवून तीन किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत खेचले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रातील दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील एका दुकानदाराने कथितपणे महिलेला मराठीऐवजी मारवाडीत बोलण्यास सांगितल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सविस्तर वाचा
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.
सविस्तर वाचा
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेंस संपत नव्हता, आज 4 डिसेंबर रोजी या नावाचे अनावरण होऊ शकते. आज मुंबईत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून, त्यात भाजपच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते मुंबईत पोहोचले आहे.
सविस्तर वाचा
महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले असून त्याची पोस्टर्स मुंबईत लावली आहे.
सविस्तर वाचा
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाबाबत सुरू असलेला सस्पेन्स आज संपुष्टात येऊ शकतो. तसेच आज भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात नेत्याची निवड केली जाणार आहे.
सविस्तर वाचा
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान मंगळवारी मुंबईत आयोजित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन कॉटन टेक्नॉलॉजी (CIRCOT) च्या शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले होते.
सविस्तर वाचा
देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूरी
आजचा सरकार बनविण्याचा दावा प्रस्तुत करणार, दुपारी 3.30 मिनिटावर राजभवनात पोहचतील
उद्या मुंबईतील आझाद मैदानावर आझाद मैदानावर शपथविधी
बावनकुळे यांनी महायुती मधील सर्व पक्षांचे आभार मानले
एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतील
हाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होऊन अवघ्या 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा
कधी कधी नवीन काहीतरी करून पाहणे अवघड होऊन बसते. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील सोलापूरमधील मरकडवाडी गावात घडला.
महाराष्ट्रच्या नव्या मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स आता संपला आहे. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या पाठिंब्याने काही तासांसाठी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना 'अपमानास्पद' होऊन मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.
सविस्तर वाचा ...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या नावावर देवेंद्र फडणवीसांचे नाव शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथ विधी सोहळा होणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापनेसाठी सुरू असलेली प्रतीक्षा बुधवारी संपली. महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जे महायुतीचे सदस्य होते, यांनी राजभवन येथे राज्यपालांना आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सुपूर्द केली.
ठाण्यात पाच बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला बेकायदेशीरपणे राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मीरा रोड आणि नयानगर येथे छापे टाकले. महिलांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांना दुभाष्याची मदत घेण्यात आली.