गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :औरंगाबाद , शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (12:43 IST)

तलवार घेऊन हिरोपंती पडली महाग

arrest
हातात तलवार घेऊन केलेले फोटोसेशन सोशल मीडियावर पोस्ट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुक पोस्टची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांनी तरुणावर कारवाई केली. त्याच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद राफेउद्दीन उर्फ राफे सलाउद्दीन (वय २० वर्ष, रा. रशीदपुरा, औरंगाबाद) असे व्हायरल दादाचे नाव आहे. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.