बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 4 जुलै 2024 (13:02 IST)

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

snake in food
Maharashtra News: महाराष्ट्रातील सांगलीमध्ये एक बातमी समोर आली आहे. एका अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेट मध्ये निघाला मेलेला साप. या बद्दल चौकशी सुरु झाली आहे. सांगली जिल्हा  परिषद उपमुख्य कार्यकारी ने अंगणवाडीचा दौरा केला.
 
राज्य अंगणवाडी कर्मचारी संघची उपाध्यक्ष आनंदी भोसले ने सांगितले की, पलुसमध्ये एका लहान मुलाच्या पालकांनी या घटनेची सूचना सोमवारी दिली.  
 
अंगणवाडी कर्मचारी संघ उपाध्यक्ष ने बुधवारी सांगितले की, सहा महिन्यापासून ते तीन वर्षाच्या मुलांना अंगणवाडी केंद्रामध्ये मध्याह्न भोजनचे पॅकेट मिळतात. या पॅकेट मध्ये डाळ खिचडीचे मिश्रण असते. सोमवारी पलुसमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जेवणाचे पॅकेट वाटले. एका लहान मुलाच्या पालकांनी दावा केला की त्यांना मिळालेल्या पॅकेट मध्ये मेलेला साप होता.
 
आनंदी भोसले यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका (महिला कार्यकर्ता) ने अधिकारींना या घटनेची सूचना दिली. त्यांनी सांगितले की, सांगली जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव आणि खाद्य सुरक्षा समितिचे इतर अधिकारींनी अंगणवाडीचा दौरा केला आणि पॅकेटला प्रयोगशाळा परीक्षणाकरिता नेण्यात आले. जिल्हा परिषदच्या अंगणवाडी अनुभागचे प्रभारी यादव यांची अनेक प्रयत्न केल्या नंतर देखील संपर्क झाला नाही.