बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (16:37 IST)

सीएमओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मंत्रालयाचा फोटो

राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर तातडीने सीएमओ कार्यालयच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये उद्धव ठाकरे यांचा डीपी ठेवण्यात आला होता. मात्र काही तासांमध्ये हा डीपी बदलून मंत्रालयाचा फोटो ठेवण्यात आला. 
 
यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सीएमओ ट्विटर हँडलवर फडणवीसांचा फोटो डीपीवर ठेवण्यात येत होता. भाजपा सरकारच्या काळात मंत्रालयातील जनसंपर्क विभाग कार्यालयही मोठ्या प्रमाणावर अपडेट झालं. वेबसाईट्स, फेसबुक, ट्विटर, यु-ट्यूब अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला.