बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

Maharashtra HSC Result 28 मे रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा (HSC) निकाल २८ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी महाराष्ट्र बोर्डाने अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. तसेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. 
 
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. 
 
सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे विद्यार्थी आता महाराष्ट्र बोर्डाचा निकालाकडे लक्ष लावून आहेत.
 
येथे पाहू शकता निकाल
 
निकाल पाहण्यासाठी–
 
वरील दिलेल्या साइट्सपैकी एकावर क्लिक करा
त्यावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
रोलनंबर टाका
निकाल स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट देखील घेता येईल