1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (08:22 IST)

उज्ज्वला योजनेंत महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोड देण्यात महाराष्ट्र पिछाडीवर पडत असल्याचे केंद्र शासनाच्या आकडेवारीवरून दिसते. १५ नोव्हेंबपर्यंत राज्यात ३२ लाख ९९ हजार गॅस जोड दिले असून, देशात महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रापेक्षा लहान असलेल्या राज्यांनी महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे.
 
या योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र मात्र फारसे यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ांना लक्ष्यांक देऊन उज्ज्वला जोड देण्यास गती देण्यात आली. मात्र, तरी देखील महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर असून, त्या राज्यात ९७ लाख ८५ हजार जोडण्या दिल्या आहेत. दोन ते सात क्रमांकावरील राज्ये व त्यांनी दिलेले जोड असे. २)  बिहार ६८ लाख ७२ हजार. ३)पश्चिम बंगाल ६७ लाख ३८ हजार. ४)मध्यप्रदेश ५१ लाख ९२ हजार. ५)राजस्थान ४२ लाख ६० हजार. ६) ओरिसा ३४ लाख  ७४ हजार. ७) महाराष्ट्र ३२ लाख ९९ हजार ८९०.