शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (23:04 IST)

Maharashtra Legislative Assembly : भाजपनेते राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात सभापती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला

Maharashtra Legislative Assembly: फोटो साभार -सोशल मीडिया भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी सभापती निवडणुकीसाठी विधानभवनात अर्ज दाखल केला. येत्या 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे हे सभापतीपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. 

नानापटोलें  सभापदीपदावरून पायउतार झाल्यानंतर सभापतिपद रिक्त आहे.येत्या 3 जुलै रोजी म्हणजे विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापतींची निवडणूक होणार आहे. तसेच येत्या 4 जुलै रोजी शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.हे विधानसभेचे विशेष अधिवेशन त्यासाठी बोलावण्यात आले आहे. महाराष्ट्र भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी विधानसभेच्या नवीन सभापतीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. रविवारी सभापतीपदासाठी मतदान होणार आहे.उपसभापती नरहरी झिरवाळ हे कार्याध्यक्ष होते.
 
कोण आहे राहुल नार्वेकर -
नार्वेकर यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादीशी जवळचा संबंध आहे.नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजके नाईक यांचे जावई आहेत, जे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार आहेत.ते यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होते.
 
राहुल नार्वेकर यांचा जन्म दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात झाला.त्यांचे भाऊ मकरंद कुलाब्यातून नगरसेवक आहे.नार्वेकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत, ते राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत. राहुल नार्वेकर हे सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रवक्ते होते.2014 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.पक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे आपल्याला शिवसेना सोडावी लागली, असा दावा नार्वेकर यांनी केला.राहुल नार्वेकर यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली होती, त्यात त्यांचा शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडून पराभव झाला होता.
 
नार्वेकर यांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कुलाबा येथून भाजपमध्ये प्रवेश केला होता.कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे अशोक जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली.