सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (21:12 IST)

भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकी समोरासमोर धडकून समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून खाली उतरत असताना ही दुर्घटना घडली.  
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कदम (वय 32) असे या अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरील ड्युटी संपवून दुचाकीवरून परतत असताना काळाने झडप घातली. दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघात झाला.
 
दीपक हे समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून ते दुचाकीने जात होते. त्याचवेळी त्यांच्या आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक झाली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दीपक हे समृद्धी महामार्गावरील मालेगाव टोल प्लाझावर  कार्यरत होते.  
 
दीपक हे मालेगाव टोल प्लाझावरील ड्युटी संपवून आपल्या दुचाकीने घरी परतत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकी त्यांच्या दुचाकीला धडकली. अपघात इतका भीषण होता की दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समजते.
 
भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे झाला. या प्रकरणी लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
 
लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे शंकरपट पटाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शंकरपट पाहण्यासाठी दुचाकीस्वार जात होता. त्याचवेळी भरधाव कारने धडक दिली.