शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (12:06 IST)

आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सेलिब्रेटींची मदत

शेतकऱ्यांची शेती संबंधित  व्यवसायात प्रगती, विविध योजनांची  त्याच्यापर्यंत पोहोचावी  म्हणून सहकार्य करण्यासाठी अक्षय कुमार, शाहरुख यासारख्या सेलिब्रेटींना पाचारण करण्याची तयारी फडणवीस सरकारने सुरु केली आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्रालयाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी सुपरस्टार्सची मदत घेतली जाणार आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय यासारख्या सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांचा यात समावेश असेल. अनेकांना पत्र लिहून विचारणा करण्यात आली असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्याचं जानकर म्हणाले. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी जानकरांनी शाहरुख खान आणि इतर काही कलाकारांना योगदान देण्याची विनंती केली आहे. प्राण्यांसाठी मोबाईल व्हॅन्स, भटक्या कुत्रे आणि मांजरींसाठी लसीकरण, देशी गायींसाठी निवारा, ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांसाठी उद्योग योजना यासारखे प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.