1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:44 IST)

सावधान, पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांमध्ये आज गारा पडण्याची देखील शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आलं आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या भागांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट होऊ शकते. ऐन थंडीत अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.
 
दुसरीकडे गेल्या दोन दिवसात राज्यात तापमानात मोठा बदल होत आहे. राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. 9 जानेवारी रोजी  उत्तर महाराष्ट्रात, कमाल तापमान खाली घसरलं होतं. उ मध्य महाराष्ट्र, उ कोकण मुंबईसह व संलग्न मराठवाडा भाग, तसेच विदर्भात तापमानाचा पारा खाली घसरला आहे.