शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (08:38 IST)

मराठा समाजाचे आरक्षण एटीआर विधिमंडळात होणार सादर

मराठा आरक्षणासाठी आजचा पूर्ण दिवस महत्त्वाचा असणार असून, सकाळी साडे दहा वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर सोबतच विधेयक मांडलं जाणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली असून. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधीमंडळात एटीआर, विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती दिली आहे. या आगोदर पुन्हा एकदा उपसमितीची बैठक पार पडणार असून, त्यामुळं एटीआर आणि विधेयकामध्ये मराठा आरक्षणासाठी काय तरतूद करण्यात आली आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. मात्र मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यावर उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली असे समोर येते आहे. बुधवारी अधिवेशनाच्या आधी याबद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपसमितीचे नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली होती. त्यामुळे आता ओबीसी कोटा न हलवता व कोर्टात टिकेल असे मराठा आरक्षण सरकार देणार का ? असा मोठा प्रश्न आहे.