मराठी साहित्य संमेलन वृत्त विशेष: संमेलनात अजूनही वादाचे सत्र सुरूच
नाशिकमध्ये संपन्न होत असलेल्या ९४ व्या साहित्य संमेलनासाठी सुरु असलेल्या वादाचे सत्र अजूनही सुरु आहे. संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळ हे समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख यांच्या नावाने चाललवले जाते. मात्र, संमेलन गीतामध्ये त्या लोकहितवादी यांच्या ऐवजी चक्क नाना शंकरशेठाचा फोटो टाकण्यात आला आहे.
नाशिकमध्ये सध्या संमेलन गीताच्या प्रचारासाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. याच गीतामध्ये चक्क लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांच्याऐवजी नाना शंकरशेठ यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे. त्यांच्याच नावाचा उल्लेख जिथे येतो, तिथे हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे लोकहितवादी आणि नाना शंकरशेठ यांच्या पगडीत, मिशात फरक आहे. दोघेही वेगवेगळे गंध लावायचे. इतका मोठा फरक असतांना अशी चूक कशी झाली यावर विचारणा होत आहे.
याआधी नाशिकचे भूमीपुत्र आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक वि. दा. सावरकर यांचेच नाव संमेलन गीतामध्ये घेतले नव्हते. यावरून प्रचंड वाद झाला. अखेर गीतामध्ये सावरकरांचे नाव समाविष्ट करण्यात आले.