1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (09:25 IST)

मराठी साहित्य संमेलन : गुलजार, जावेद अख्तर यांच्या नावाला ब्राह्मण महासंघाचा विरोध

Marathi Sahitya Sammelan: Opposition of Brahmin Federation to the names of Gulzar and Javed Akhtar Maharashtra News  Regional Marathi News  In webdunia Marathi
नाशिकमध्ये 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे संमेलन येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी होईल.
 
या संमलेनामध्ये प्रसिद्धी कवी आणि गितकार जावेद अख्तर तसेच गुलजार यांना सहभागी करुन घेण्याचा विचार सुरू आहे. पण ब्राह्मण महासंघाने या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.
 
जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी साहित्यसृष्टीत काय योगदान आहे? वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर, गुलजार कशासाठी? असे प्रश्न महासंघाने उपस्थित केले आहेत. या संमेलनामध्ये गुलजार आणि अख्तर यांच्या नावांचा समावेश करण्याला आमचा विरोध राहील, असं ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी स्पष्ट केलं.