बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (09:20 IST)

ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द, मात्र मेळावा होणार

डिसेंबर महिन्यातील सात तारखेपासून मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार होता. यावेळी ओबीसी समाजकडून आरक्षण तसेच इतर अनेक मागण्या सरकार समोर मांडल्या जाणार होत्या. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा हा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.  
 
मात्र, ओबीसी समाजाचा 13 डिसेंबरला मराठवाड्यात होणारा मेळावा नियोजित तारखेलाच होणार असे, प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. राज्याच्या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणांनी त्या अनुशंगाने तयारीदेखील सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मोर्चाचे आयोजन करणे उचित होणार नाही. त्यामुळे सात डिसेंबरचा ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द केला आहे, असे प्रकाश शेंडगे 
 
यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.