शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माटुंगा स्टेशनवर केवळ महिला कर्मचारी

मुंबई- आता भारताता असेही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचेच राज्य असेल. होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्ये रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे. मध्ये रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड हे स्टेशन लवकरच एक इतिहास रचणार आहे.
 
जवळपास एका आठवड्याभरात हे रेल्वे स्टेशन महिला कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. हे देशातील पहिलेच स्टेशन असेल जिथल्या सर्व कर्मचारी केवळ महिलाच असतील. माटुंग स्टेशनवर जवळपास 30 महिलांचा स्टाफ आहे. यातील 11 बुकिंगसाठी, 7 तिकीट कलेक्टर्स, 2 चीफ बुकिंग सल्लागार आणि इतर कर्मचारी आहेत. महिला सशक्तीकरणाला यामुळे मदत मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला आहे.