शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (15:02 IST)

वसंत मोरे यांना मुख्यमंत्र्यांचा भेटायला या असा निरोप

vasant more
भोंग्यांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांना राष्ट्रवादीनेही पक्षात येण्याची ऑफर दिलेली असतानाच थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. भेटायला या असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना देण्यात आला आहे. खुद्द मोरे यांनी या बाबतची माहिती दिली आहे. मात्र, आपण अजूनही मनसेत आहोत. मनसे सोडण्याचा विचार केलेला नाही. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यांना कालच मेसेज केला आहे. मात्र, त्यांनी अद्याप मेसेजला उत्तर दिलं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबतची माहिती खुद्द वसंत मोरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत माझं डायरेक्टली बोलणं झालं नाही. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरेंचा फोन आला होता. सीएमचा माझ्यासाठी फोन आहे म्हणून सांगत होते. त्यावेळी मी नेमका कात्रजमध्ये नव्हतो. मी सर्वांना सांगितलं मी अजून मनसेत आहे. माझा पदभार मी साईनाथ बाबर यांच्याकडे दिला आहे. पण मी मनसेतच आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला या म्हणून मला निरोप दिला आहे. मुख्यमंत्र्याचा आणि इतरांचेही फोन आले, असं मोरे यांनी सांगितलं.