मित्रांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलीस कर्मचाऱ्यासह 5 जणांना अटक
Chandrapur News राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका हवालदारासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी रविवारच्या घटनेची गंभीर दखल घेत सोमवारी पोलिसांच्या सी-60 युनिटमधील हवालदाराला निलंबित केले, असे त्यांनी सांगितले.
पोलिस कर्मचारी आणि त्याचे मित्र पार्टीसाठी येथील मामला भागात गेले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परतत असताना त्यांनी मामला रोडवर एका अल्पवयीन मुलीसह दोन जोडप्यांना बसलेले पाहिले. तेव्हा पोलीस शिपाई बावणे यांनी या जोडप्याना धमकावले.
जबरदस्ती गाडीत बसण्यास सांगत असे न केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावरून दोन जोडपी व पोलीस शिपाई यांच्यात वाद झाला तेव्हा शिपाई बावणे याने मुलीला जबरदस्तीने गाडीत बसविले आणि तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या मैत्रिणीने बघितला.
पीडित मुलीच्या मैत्रिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारावर शिपाई सचिन बावणे तथा चार मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.