गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (17:21 IST)

मिरा-भाईंदर महापालिका : 95 पैकी 61 जागांवर भाजप विजयी

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे.  24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मिरा-भाईंदर महापालिकेची लढाई सर्व पक्षांनी स्वबळावर लढली होती. निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने ही चर्चा खोटी ठरवत बहुमत मिळवलं. तर शिवसेनेला 22 जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसेल खातंही उघडता आलेलं नाही. याशिवाय अपक्षांनी दोन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी एक उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.