1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (08:36 IST)

मिरज : ३५०० खाऊच्या पानाला मिळाला ४५०० रु.विक्रमी दर!,शेतकऱ्यांना चांगला फायदा

vida
मिरज तालुक्यातील  नरवाड  येथील पान‌ बाजारात झालेल्या सौंद्यात तानाजी चव्हाण पान‌ उत्पादक शेतकऱ्यांला ३५०० पानाला तब्बल  ४५०० रूपये मिळाले आहे. यामुळे पानमळा शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून पान विक्रीत तेजीत आली असून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
 
नरवाड येथे बेडग, माळीवाडी, लक्ष्मीनगर, विजयनगर, म्हैसाळ अन्य भागात काही शेतकरी पानमळा शेती करतात.सदर पानांचा सौदा नरवाड येथे केला जातो.याठिकाणी परीसरांतील शेतकरी आपले पानांचे डाग आणतात.दररोज सायंकाळी या पानांचा सौदा संत बाळू मामा पान कंपनी नरवाड यांच्या वतीने केला जातो. सर्व पांन डागांचे एकत्रीकरण करून सौदा केला जातो व  जागेवरच पानांची बिल पट्टी शेतकऱ्यांना दिली जाते अशी माहिती संचालक नितीन खरमाटे यांनी बोलताना दिली.नंतर सदर पानांची विक्री करण्यासाठी मुंबई,पुणे बाजार पेठात पाठवली जाते असेही खरमाटे यांनी सांगितले.याठिकाणचे शेतकरी प्रामुख्याने कळी व‌ फापडा पानांचे उत्पादन घेतात.स्थानिक पातळीवर कळी पानाला मागणी असल्याने येथेच विक्री केली जाते. तर फाफडा पानाला मुंबई पुणे बाजार पेठात विक्री साठी पाठवले जाते.कोरोना काळापासून पानाला फारसा दर मिळत नव्हता.

मात्र या वर्षभरात पानाला चांगला दर मिळतो आहे.उत्पादन खर्च वजा जाता किमान ६० ते ७० टक्के रक्कम मिळते.परंतु अलिकडे  या कामासाठी कुशल व अनुभवी मजूर फारसे मिळत नाहीत.यामुळे मिळेल‌ त्यांना अधिक मजूरी द्यावी लागते.अशी माहिती तानाजी चव्हाण यांनी दिली.

Edited By- Ratnadeep Ranshoor