पंढरपूरात विठुरायाच्या मंदिरामध्ये मोबाईल बंदी
पंढरीच्या विठुरायाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.
याआधी महाराष्ट्रातल्याच शिर्डी देवस्थानामध्ये देखील अशाच प्रकारे मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
मोबाईल फोनसोबतच मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी लाऊड स्पीकरची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. याआधा देखील मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांकडून मोबाईल फोन नेण्यासाठी मज्जाव करण्यात येत होता. मात्र,आता समितीनेच तसा निर्णय जारी केला आहे.