बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (10:49 IST)

एमआयच्या 3 एस प्राइम मोबाइलचा स्फोट

नाशिकमधील सिडकोतील मोरवाडी येथे चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. स्फोटामुळे इतर वस्तूंचेही नुकसान झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. राहुल आव्हाड या युवकाने घरात असताना त्याचा मोबाइल दुपारच्या सुमारास चार्जिंगला लावला होता. मोबाइल चार्जिंग होत असताना अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. मोबाइलच्या आजूबाजूला असलेल्या इतर वस्तूंचेही यामुळे नुकसान झाले. हा प्रकार तत्काळ लक्षात येताच राहुल याने मोबाइल बाहेर फेकला. दीड वर्षांपूर्वीच त्यांनी एमआय या कंपनी- 3 एस प्राइम हा मोबाइल घेतला होता.