गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (17:58 IST)

तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार कधीही पडू शकते, संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut Statement Lok Sabha Election Results
लोकसभा निवडणूक निकाल कालच जाहीर झाला असून निकालाने सर्वाना चकित केले आहे. या वेळी सर्वच पक्ष बहुमताच्या चिन्हापासून दूर राहिले आहे.तरी केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यादरम्यान संजय राऊतांनी मोदी सरकारवर टोला लगावला आहे. ते म्हणाले यंदा मोदींचे नव्हे तर एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. 
 
मोदींची गॅरंटी जनतेने नाकारली असून भाजपचा दारुण पराभव केला आहे. भाजपला जरी 240 जागा मिळाल्या तरीही त्यांना बहुमत मिळाले नाही. आता त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या सोबत सरकार बनवावी लागणार आहे. आणि ही सरकार कधीही पडू शकते. यंदा तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार नाही. भाजपला ज्या जागा मिळाल्या आहे त्या ईडी आणि सीबीआय मुळे मिळाल्या आहे.असा दावा त्यांनी केला आहे.  
 
राहुल गांधी यांची इच्छा असेल तर ते पंतप्रधान बनू शकतात.आम्ही त्यांच्या सोबत आहोत. टीडीपी आणि जेडीयू शिवाय भाजप सरकार बनू शकते का. भारतातील जनता एकत्र बसून भविष्याची रणनीती ठरवणार त्यांना कोणाची सरकार पाहिजे. 

Edited by - Priya Dixit