शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जून 2022 (08:44 IST)

राज्यात मान्सून लांबणार!

clouds
पणजी :गेल्या 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी किंचित पावसाच्या सरी पडून गेल्या. पुढील 4 दिवसांतही देखील पावसाचा जोर असणार नाही. केवळ तुरळक पावसावरच समाधान मानावे लागणार आहे.
 
हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत बहुतेक ठिकाणी किंचित पावसाच्या शिडकाव होऊन गेला.  अन्यथा समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. पुढील 4 दिवसांमध्ये देखील फारशी  प्रगती अपे<क्षित नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप 3 इंच पाऊस सरासरी कमीच पडलेला आहे. मान्सून अचानक कमकुवत झालेला आहे. गोव्याच्या पूर्वेकडून म्हणजेच बंगालच्या महासागरातून नव्याने पावसाचे ढग पश्चिमेकडे सरकत असून साधारणतः 19 जूनपर्यंत गोव्यात जोरदार पावसाची शक्यता.