रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (08:46 IST)

राज्यातील १० हजारांहून अधिक उमेदवारांवर 'पदवीधर' आमदार निवडणूकीसाठी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता

gopichand padalkar
३० जानेवारीला पदवीधर मतदार संघाची निवडणुका होत आहे. मात्र, याच दिवशी नगरविकास, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांच्या गट 'अ' आणि 'ब' साठी परिक्षा होणार आहेत. यासाठी राज्यात विविध ठिकाणी परिक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, या परीक्षा दोन सत्रांत होणार आहेत. यामुळे, राज्यातील १० हजारांहून अधिक उमेदवारांवर 'पदवीधर' आमदार निवडणूकीसाठी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुक आयोगाला पत्र लिहिले आहे.  
 
आपल्या पत्रात गोपीचंद पडळकर यांनी महटले आहे, "जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोण्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे."
 
"भारत हा युवकांचा देश आहे. या पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचं काम 'पदवीधर' आमदार करतात. मात्र तब्बल १० हजार पदवीधरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या गंभीर मुद्द्याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी हे पत्र मी लिहीत आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor