1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (17:51 IST)

चंद्रपूरमध्ये 100 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

thali
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 100 हून अधिक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे , अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात पारडी येथे एका जिल्हा परिषद शाळेतील 106 विद्यार्थ्यांनी दुपारी संस्थेत जेवण केले नंतर रात्री पोटदुखी आणि उलट्याची तकार झाल्यावर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या 62 विद्यार्थी मूळ तहसीलच्या उपजिल्हा रुग्णालयात आहेत.
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना या रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तपासणीचा भाग म्हणून अन्न व औषध प्रशासनाने अन्नाचे नमुने विश्लेषणासाठी गोळा केले आहेत

भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले . या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली.
Edited By - Priya Dixit